जन्म-मृत्यू दाखल्यां संदर्भात जागो ग्राहक जागो संघटनेचे चाळीसगाव पालिकेला निवेदन

जन्म-मृत्यू दाखल्यां संदर्भात जागो ग्राहक जागो संघटनेचे चाळीसगाव पालिकेला निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :- 

जन्म व मृत्यू दाखला हा नागरिकांच्या दैनंदिन तसेच शासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विविध शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, पासपोर्ट, आधारकार्ड, वारस नोंदणी आदी कामांसाठी या दाखल्यांची आवश्यकता भासते. मात्र, चाळीसगाव नगरपरिषदेतून जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास तब्बल दोन ते तीन महिन्यांचा विलंब होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दाखले वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी करीत नॅशनालिस्ट कंज्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (जागो ग्राहक जागो), चाळीसगाव शाखेच्या वतीने सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी हनुमंत बंगर यांना निवेदन देण्यात आले. जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी नगरपरिषदेकडे प्राप्त होणाऱ्या अर्जांची तातडीने छाननी करून पात्र अर्जदारांना शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार नगरपरिषद कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात तसेच तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात आहेत. परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, काही प्रकरणांतील दाखल्यांना जळगाव येथील संबंधित कार्यालयाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याने चाळीसगावातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. या प्रक्रियेत आवश्यक तो समन्वय साधून मंजुरीची कार्यवाही जलदगतीने होण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. जन्म व मृत्यू दाखले वेळेत न मिळाल्यामुळे नागरिकांची शैक्षणिक, शासकीय तसेच अन्य महत्त्वाची कामे रखडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन दाखले वितरणाची प्रक्रिया गतिमान करावी आणि नागरिकांना विनाकारण होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. सदर निवेदन नॅशनालिस्ट कंज्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या चाळीसगाव शाखेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हनुमंत बंगर यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनावर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष खुशाल पाटील, चाळीसगाव तालुका अध्यक्ष विकास वाणी, सचिव दत्तात्रय पिंगळे, अल्पसंख्याक संघटक शेख सरदार, चाळीसगाव शहर अध्यक्ष विजय पाटील आणि उपाध्यक्ष दत्तात्रय (चंदन) वाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें