पसरणी ठरणार जिल्ह्यासाठी रोल मॉडेल; इलेक्ट्रिक घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न.
वाई प्रतिनिधी; आधुनिकतेची कास धरत प्रदूषण आणि पारंपारिक खर्चाला आळा घालण्यासाठी पसरणी ग्रामपंचायतीने अत्याधुनिक घंटागाडी विकत घेतली आहे इलेक्ट्रिक असणारी घंटागाडी ही सातारा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ प्रज्ञा माने(भोसले) यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आसपास असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अद्यावत इलेक्ट्रिक घंटागाडी लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती दर्शवली या सोहळ्या दरम्यान उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी विद्यमान सरपंच पसरणी हेमलता गायकवाड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला इतर ग्रामपंचायतींनी अशा उपक्रमांचा आदर्श घ्यावा असे संबोधन केले कार्यक्रमाची प्रस्ताविका सादर करताना पसरणी ग्रामपंचायत मूलभूत प्रश्नांबरोबर नावलौकिक करणारे उपक्रम व योजना पसरणीमध्ये राबवून नाविन्यपूर्ण प्रयोग करू आणि असे प्रयोग करताना ग्रामपंचायत सदस्य गावातील जेष्ठ मंडळी यांना सोबत घेऊन मार्गदर्शन घेऊन राबवु अशी ग्वाही स्वप्निल गायकवाड यांनी दिली.
दोन पद्मश्री असणाऱ्या या गावाला विशेष महत्त्व प्राप्त आहे नाविन्यपूर्ण योजना आणि नावलौकिकतेचा नवा अध्याय या गावात सुरू होईल असेही मत मांडले
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रज्ञा माने (भोसले)उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा.
पसरणी सरपंच हेमलता गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुनिता कांबळे उपसरपंच बद्रीनाथ महांगडे माजी उपसरपंच विशाल शिर्के, ग्रामपंचायत सदस्य श्री गेनू हरकळ, आनंदा येवले बाळासाहेब शिर्के,
सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब जाधव विस्तार अधिकारी श्री राहुल हजारे बांधकाम अभियंता मनोज पवार पाणीपुरवठा अभियंता प्रमोद भोई कुसगावच्या विद्यमान सरपंच सीमा वरे व्याहळी गावच्या सरपंच बोरीच्या सरपंच सौ सुजाता कांबळे ,अजय मांढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुनियोजन माजी पंचायत समिती सदस्य राजे शिंदे अमोल महांगडे दत्तात्रय महागडे आदी मान्यवर ग्रामस्थांनी केले ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री रामदास निंबाळकर यांच्यासह मनोज मांढरे उत्तम गाढवे चंद्रकांत महागडे निकिता दुधाने वैभव मांगडे काजल गायकवाड यांनी सहश्रम सहभाग नोंदवला










