साताऱ्यातील कामेरीच्या जवानाला विरमरण आले
सातारा प्रतिनिधी:
साताऱ्यातील बहुसंख्य युवक लष्करामध्ये कार्यरत आहेत काही गावांना तर लष्कराच्या नावानुसार ओळखले जाते त्यामध्ये मिलिटरी आपशिंगे देशमुख नगर कामेरी या गावांना लष्करी परंपरा आहे
जम्मू कश्मीर मधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ भयंकर अपघात झाला आहे.
यामध्ये बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 11 मराठा लाईफ इन्फंट्री देशसेवा करणारे कामेरी ता.जि.सातारा गावचे सुपूत्र श्री. शुभम समाधान घाडगे वय 28 हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत.
शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले होते.माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी काँलेज अपशिंगे मि. येथे होऊन पुढे तो लष्करात भरती झाला.
त्यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपूत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले आहे .शुभमच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.










