वनविभागाच्या पथकाने दिला विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवनदान

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

तालुक्यातील शिवापूर शिवारातील अशोक नामदेव राजपूत यांच्या शेतातील विहरीत काल दि. 17 रोजी सकाळी एक बिबट्या पडला अशोक राजपूत हे शेतात गेल्यावर त्यांना सदर बाब लक्षात आली. त्यांनी लगेच पोलीस पाटील यांना सदर माहिती दिली. व त्यानंतर पोलिस पाटिल यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांनी लागलीच सर्व कर्मचारी आणि चाळीसगाव ग्रामीण पो. स्टे. चे एपीआय नितीन पाटील यांना कळवून पोलीस कर्मचारी तैनात करण्याबाबत कोमल पिंडकुरवार मॅडम यांनी कळवले. वनरक्षक के. बी. पवार, उमेश सोनवणे, वनमजूर संजय देवरे, बाळू शितोळे यांना पुढे जाण्याच्या सूचना दिल्या शेतकरी आणि गावाकऱ्यांच्या मदतीने बाज व पिंजरा विहिरीत सोडले, सदर बिबट्या हा बाजेवर येऊन बसला, व त्यानंतर लगेच पिंजऱ्यात जाऊन कोंडले गेला, त्यानंतर लगेच पिंजऱ्याचे गेट बंद करून पिंजरा विहिरीतून बाहेर काढत सुरक्षित केले. सदर पकडलेल्या बिबटस पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहेत्रे यांच्याकडून तपासणी करण्यात आली सद बिबट्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. सदर कार्यवाही मा.वनसंरक्षक (प्रा.) धुळे, मा. राम धोत्रे उपवनसंरक्षक जळगाव वनविभाग जळगाव, मा.अमोल पंडित, सहाय्यक वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव जळगाव, विवेक देसाई मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार, वनपाल सागर पाटील, सी व्ही पाटील, वनरक्षक के बी पवार, उमेश सोनवणे, ललित पाटील, रवींद्र पवार वनमजूर बाळू शितोळे, संजय देवरे, संजय गायकवाड, भाईदास राठोड, राजाराम चव्हाण, नितीन राठोड, गोरख महाराज यांनी केली. सोबत पोलीस कर्मचारी भगवान माळी आणि प्रवीण संगिले गावातील नागरिक भिला राजपूत, कल्पेश राजपूत, दशरथ राजपूत, परशराम गोपाल, बंडू देशमुख, विशाल राजपूत यांनी सहकार्य केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal