अवैध उत्खनन डंपर चालकाविरोधात लोणंद पोलिसात गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
अनाधिकृत गौण खनिज माती वाहतूक प्रकरणात महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका डंपर चालकाविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोणंद निंबोडी रोडवर कानिफनाथ मंदिरापासून लोणंद कडे सुमारे 100 मीटर अंतरावर डंपर क्रमांक एम एच 11 सी एच 21 30 मधून अनधिकृत रित्या माती वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले महसूल विभागाचे कर्मचारी पोलिसांनी संबंधित डंपर चालक अभि बाळासाहेब शेळके वय 37 राहणार निंबोडी तालुका खंडाळा याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याला लोणंद पोलीस ठाण्याकडे आणत असताना त्याने डंपर रस्त्याखालील उतरवून त्यातील माती खाली करण्यास सुरुवात केली. यावेळी महसूल सेवक कुंभार यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याचा हात झटकून वेगाने डंपर घेऊन घटनास्थळावरून पळ काढला यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी तलाठी चेतन रामराव डोईफोडे वय 24 यांनी फिर्यादी दिली आहे












