हेमाडपंथी महादेव मंदिरात दुग्धाभिषेक व परिसर स्वच्छता करून सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती साजरी

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवरायांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली, प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी पाटणादेवी जंगल परिसरातील हेमाडपंथी महादेव मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवली त्यानंतर महादेवावर दुग्धाभिषेक करण्यात आला. या धार्मिक विधीनंतर शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. “गडकोट, देवस्थान आणि इतिहासाची साक्ष देणारी वारसा स्थळे जपणे हीच खरी शिवभक्ती” असा संदेश देण्याचा सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता व संस्कृती संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला, दरम्यान तेथील भाविकांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या या कार्याचे कौतुक केले, या उपक्रमामुळे धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि इतिहासाबद्दलची जागरूकता यांचा सुंदर संगम साधला गेल्याची भावना व्यक्त केली गेली, या प्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, सचिन पाटील, गजानन मोरे, बाळासाहेब सोनवणे, संजय साठे, जितेंद्र वाघ, गणेश पप्पू पाटील, मोहन भोळे, ललित चौधरी, सचिन पाटील, बबलू चव्हाण, रत्नदीप पाटील, कार्तिक चौधरी, कृष्णा चौधरी, साई पाटील यांच्यासह संह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रतिनिधी रणधीर जाधव 

AVB महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal