फलटणच्या पूर्व भागासाठी ‘पाणीदार’ निर्णय; धोम-बलकवडीच्या बंदिस्त पाईपलाईनची निविदा प्रसिद्ध! रणजितदादांच्या पाठपुराव्याला मोठे यश

फलटणच्या पूर्व भागासाठी ‘पाणीदार’ निर्णय; धोम-बलकवडीच्या बंदिस्त पाईपलाईनची निविदा प्रसिद्ध! रणजितदादांच्या पाठपुराव्याला मोठे यश

फलटण,  : फलटण तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी परिस्थिती कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम आता उघड्या चारीने न करता बंदिस्त पाईपलाईनद्वारे करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील बरड, कोळकी आणि गुणवरे या जिल्हा परिषद गटांतील हजारो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कामासाठी सुमारे ४०.६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. धोम-बलकवडी उजव्या कालव्याच्या कि.मी. १२८ ते १४७ मधील वितरण व्यवस्थेचे काम आता बंदिस्त नलिकेद्वारे होणार आहे. यामुळे पाण्याची होणारी गळती थांबणार असून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पामुळे पूर्व भागातील एकूण २३०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील गावांचा समावेश आहे:

 * दुधेबावी (१२४ हेक्टर), मिरढे (५६२ हेक्टर), नाईकबोमवाडी (१४१ हेक्टर).

 * वडले (२१३ हेक्टर), शेरेशिंदेवाडी (१४६ हेक्टर), बरड (१०८ हेक्टर).

 * कुरवली बु. (१८६ हेक्टर), जावली (५०२ हेक्टर) आणि आंदरूड (३२३ हेक्टर).

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “धोम-बलकवडी प्रकल्पाच्या अंतर्गत बंदिस्त पाईपलाईनद्वारे (PDN) पोट कालवा मंजूर केल्याबद्दल राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मी विशेष आभार मानतो. या योजनेमुळे आता फलटण तालुक्यातील बरड, कोळकी व गुणवरे या पुर्व भागातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचण्याचे काम करता येणार आहे. फलटण तालुक्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

पूर्व भागातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal