अतिरेक्यांना जागीच संपवून टाका: सकल हिंदू समाजाची साताऱ्यात मागणी
जम्मू काश्मीर राज्यातील पहेलगाम येथील हिंदूंवरील भ्याड हल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निषेध करत जाहीर मागणी करण्यात आली ,
भारताचे एक राज्य असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहेलगाम भागामध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करून त्यांना ठार मारले आहे , खेदाची गोष्ट ही आहे की त्यांनी नाव आणि धर्म विचारून , त्यांचे कपडे काढून, त्यांची निघृण हत्या केली आहे, वास्तविक पाहता संपूर्ण भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना जम्मू-काश्मीरच्या भागात या हत्या करण्यात आल्या, अतिरेक्यांना कोणताच धर्म नसतो असे सांगणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की धर्म विचारून हिंदू असलेल्या पर्यटकांचीच हत्या करण्यात आली आहे
जात कोणती, पक्ष कोणता, संघटना कोणती, उपजात कोणती हे काहीही न पाहता फक्त धर्म विचारून आणि फक्त हिंदू आहे म्हणूनच या हत्या करण्यात आल्या आहेत
अतिरेकी पुन्हा त्यांच्या जुन्या आणि घाणेरड्या संस्कारावर येऊन हिंदूंची हत्या करत आहेत, तीस हिंदूंची हत्या झाली असून, अनेक पर्यटक जखमी झाले आहेत
जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून असल्या भ्याड हल्ल्यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, आम्ही सर्व जम्मू काश्मीरमधील हिंदूंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, इथून पुढे असे कोणतेही घटना घडणार नाही याची खबरदारी स्थानिक प्रशासनाने घ्यावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व अतिरेक्यांना जागेवर गोळ्या घालाव्यात जे शिल्लक राहतील त्यांना जाहीर फाशी दिली जावी त्याचप्रमाणे हिंदूंनी निशास्त्र राहून चालणार नाही त्यांनीही आता हातात शस्त्र घ्यायला हवीत अशी मागणी करण्यात आली, सर्व हिंदूंनी जात पात विसरून एकत्र राहिले पाहिजे, एक है तो सेफ है हा नारा ही या ठिकाणी देण्यात आला
सकल हिंदू समाजातर्फे या निवेदनाच्या प्रती निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कारवाईसाठी
माननीय राष्ट्रपती ,पंतप्रधान ,गृहमंत्री संरक्षण मंत्री भारत सरकार यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, रविराज गायकवाड, विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे, सचिन वाळवेकर, सुरेंद्र बोरकर, विश्वास सावरकर, डॉ समीर सोहनी, डॉ अनंत निमकर, अजित देशपांडे, श्रीधर कुलकर्णी, विजय फडके, अपर्णा नातू भाजपाचे विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, रवींद्र पवार, किशोर गोडबोले, किशोर पंडित, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, ऍड विनीत पाटील, अविनाश खर्शीकर, वैशाली टंगसाळे, रीना भणगे ,वैष्णवी कदम , आशा पंडित, शुभम भिकनर, नीतीराज सूर्यवंशी, चिन्मय कुलकर्णी, प्रकाश घुले, अमेय अलाटे, अमोल कांबळे, चेतन घाटगे, पारस जोशी, संजय कदम, अनिता बोडस ,चैतन्य बोडस, अमित भिसे ,यशोवर्धन मुतालिक ,कांतीलाल कांबळे, राजन चाफेकर, सतीश खानवलकर ,अश्विनी हुबळीकर ,कुंजबाला खंदारे, अनिल गोसावी, प्रथमेश इनामदार ,विकास बनकर, डॉ सचिन साळुंखे, प्रिया नाईक, सतीश यादव ,उत्तमराव घोरपडे, सौरभ बोबडे ,अभिजीत कुलकर्णी, विनय कदम ,गुरुदत्त शेजवळ ,सदाशिव नाईक ,सोहम चिंचकर ,प्रकाश शिंदे, तुषार मोटे, महेंद्र कदम, मनोज नेने, डॉ सुरज मुनेर , दिलीप इंदापूरकर उमेश गोरे, सुनील दळवी, युवराज मोरकर, रत्नाकर साने ,चंदन घोडके, स्वप्निल घोरपडे ,स्वाती देशपांडे, ऋतुजा केळकर ,स्मिता मुळे ,शर्वरी जोशी, सविता पवार, नंदा इंगवले, कुंजबला खंदारे, विराज कुलकर्णी, गौरी गुरव आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते













