नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी , सोनिया गांधी यांना अटक करा : भारतीय जनता पार्टी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी , सोनिया गांधी यांना अटक करा : भारतीय जनता पार्टी

नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना अटक करावी अशी मागणी , भारतीय जनता पार्टीने पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करून केली, 

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडी ने नोटीस काढल्यावर राष्ट्रीय काँग्रेसने चोराच्या उलट्या बोंबा मारून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे, वास्तविक पाहता ईडी ही एक स्वायत्त संस्था असून त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्याचे आधारित त्यांनी हे आरोप पत्र दाखल केले आहे, आणि त्यानुसार नोटीस निघाली आहे, त्या नोटिसीला उत्तर देण्याऐवजी आंदोलने करून माननीय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार यांचे विरुद्ध जनमत तयार करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे , राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सुद्धा सात कोटीची जमीन तीन कोटी ला विकत घेतली आणि चार महिन्यांमध्ये ती अठ्ठवांन कोटी ला विकली, तीन-चार महिन्यात एवढे रक्कम येऊ शकते का, जमिनीच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात का? याबद्दलही विचार करून त्यांच्यावरही कारवाई करावी, नॅशनल हेरॉल्ड हा घोटाळा कागदपत्रे दरीत दोन हजार कोटीचा दिसत असला तरी त्याचे बाजारभावाने मूल्य पाच हजार कोटी होते, हा घोटाळा करून फक्त सरकारचीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा फसवणूक काँग्रेसने आणि राहुल गांधी सोनिया गांधी यांनी केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्याला अटक झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली

आंदोलनानंतर सर्व कार्यकर्ते काँग्रेस कमिटीच्या गेटकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना अडवले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली 

राहुल गांधी आणि सोने गांधी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात निदर्शने आंदोलने करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीतर्फे सांगण्यात आले

यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी,युवा मोर्चा सरचिटणीस – अमोल कांबळे,रोहित सावंत, शैलेश संकपाळ, गौरव इंगवले,हर्षवर्धन शेळके, पायल जाधव, जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, बेटी बचाव बेटी पढाव आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, डॉ सचिन साळुंखे , अविनाश खर्शीकर, अमोल टंगसाळे, सदाशिव नाईक, दीपक क्षीरसागर, चंदन घोडके, नगरसेवक विजय काटवटे, युवराज मोरकर, विकास बनकर, विजय नायक युवा मोर्चा उपाध्यक्ष- निलेश भोसले,अमोल चोरमले,रोहित किर्दत,तेजस कदम,विक्रम बोराटे,शहजी पवार,किरण पोळ, दिग्विजय घोरपड़े, यशोवर्धन मुतालिक, सचिव- संतोष हिंगसे,हर्षल गुरव,श्रीधर हादगे, यशमाने,मयूर काटे,इम्तियाज़ मूलाणी, युवा वॉरियर्स सहसंयोजक- श्रेयस शिंदे ,सोशल मिडिया संयोजक – प्रथमेश इनामदार ,सोशल मिडिया सहसंयोजक- नरेंद्र सावंत,प्रथमेश मोरे, विद्यार्थी विभाग संयोजक- राहुल राठौड़, मंडल अध्यक्ष दिपक फाळके, केदार गायकवाड, ऋषिकेश धायगुड़े आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal