देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद
पुणे प्रतिनिधी:
दि. १४/०४/२०२५ रोजी २३/५० वा सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त कामी डायसप्लॉट चौक गुलटेकडी येथे मा. युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, तपास पथकातील अंमलदार असे हजर असताना तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, रेकॉर्डवरील गुन्हेगार भक्तीसिंग दुधानी हा चांभार गल्ली डायसप्लॉट येथे त्याचे कमरेस पिस्टल लावुन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी आम्हांस सदर बातमीबाबत माहिती दिली अराता आम्ही वर नमुद तपारा पथकातील अधिकारी व अंगलदार यांना पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.
त्यावरुन वर नमुद स्टाफ २३/५५ वा सुमारास सदर ठिकाणी गेला असता ते ओळखत असलेला स्वारगेट पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी हा त्यांना दिसुन आल्याने सदर स्टाफ त्याचे दिशेने जाताच, तो सदर ठिकाणाहुन चांभार गल्लीमध्ये पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन शिताफिने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व पॅन्टचे उजव्या खिशामध्ये ०२ जिवंत काडतुसे असा एकुण २१,००/- रुपये किंमतीचा गाल गिळुन आल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५. क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा साो, सह-आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. प्रविण कुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा.स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- २ पुणे शहर, मा. राहुल आवारे सो, राहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. युवराज नांद्रे साो. स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस हवालदार २६८४ मोराळे, पोलीस हवालदार ७८९९ शिंदे, पो/अं १००५७ पवार, पो/अं ९९६३ खेंदाड, पो/अं १००६२ शेख, पो/अं १००६८ चव्हाण, पो/अ २१९० दुधे, पो/अं १०१४७ घुले, पो/अं ८२३७ टोणपे, यांनी एकत्र मिळुन केली आहे.










