लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून अभियांत्रिकीचे तीन नवीन पदवी अभ्यासक्रम

लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून अभियांत्रिकीचे तीन नवीन पदवी अभ्यासक्रम

लातूरमधील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २०२५-२५ या शैक्षणिक वर्ष पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

त्याचबरोबर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे नामकरण पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, लातूर असे करण्याचा निर्णयदेखील बैठकीत घेण्यात आला आहे. 

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुध्दीमत्ता व डेटा सायन्स हे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ६० इतकी असेल. हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन शिक्षकांची ३६ पदे व शिक्षकेतर ३१ पदांची निर्मिती व पदभरती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या पदांच्या वेतनावरील व पुस्तके, फर्निचर, संगणक, उपकरणे याकरिता आगामी चार वर्षांसाठीच्या २६ कोटी ६१ लाख रुपये खर्चाच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal