१५ फाटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी गेली कालव्यात; पोलीस प्रशासन व माजी सैनिक यांनी वाचवले दोघांचे प्राण

१५ फाटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी गेली कालव्यात; पोलीस प्रशासन व माजी सैनिक यांनी वाचवले दोघांचे प्राण

साखरवाडी. प्रतिनिधी 

सुरवडी ता फलटण गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या नीरा उजवा कालव्यावरील १५ फाटा पुलावरुन आज दि ६ रोजी सायंकाळी ७.३०

 

वाजण्याच्या सुमारास सुरवडी येथील दांपत्य सुरेश गौतम गायकवाड व पत्नी कोमल गायकवाड हे दुचाकी वरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी थेट कालव्याच्या पाण्यामध्ये शिरली यावेळी प्रसंगवधान दाखवून या ठिकाणी राहत असणारे माजी सैनिक धनंजय जाधव यांनी वाहत्या पाण्यात उडी मारून दोघांचेही प्राण वाचवले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सुरवडी गावातील रहिवासी सुरेश गायकवाड व त्यांची पत्नी कोमल गायकवाड हे त्यांच्या दुचाकीवरून साखरवाडीच्या दिशेने जात असताना तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट नीरा उजवा कालव्यात गेली दोघांनाही पोहायला येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा केला यावेळी कालव्याच्या विरुद्ध बाजूला उभे असणारे माजी सैनिक धनंजय जाधव यांनी तात्काळ पाण्यामध्ये उडी मारून सुरुवातीला सुरेश गायकवाड यांना बाहेर काढले व नंतर त्यांची पत्नी कोमल यांना पाण्याच्या बाहेर काढले यामुळे मोठा अनर्थ टळला याच वेळी या ठिकाणाहून पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पो हवा महादेव पिसे व पोलिस शिपाई अमोल देशमुख हे जात असताना त्यांच्या सदर घटना निदर्शनास आली त्यावेळेस त्यांनीही अपघातग्रस्तांना मदत केली दरम्यान या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक व कालव्याच्या बाजूचे तुटलेले संरक्षण कठडे बांधणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें