!!! मी शेवगावकरचा दणका मोडला बिग बुल भामटा साईनाथ कवडे याचा अहिल्यानगर एल.सी.बी. यांनी मणका !!!

!!! मी शेवगावकरचा दणका मोडला बिग बुल भामटा साईनाथ कवडे याचा अहिल्यानगर एल.सी.बी. यांनी मणका !!!

गुजरात च्या सुरत शहरातुन काल रविवारी सायंकाळी अहिल्यानगर च्या पोलिसांनी घेतले भामट्याला शिताफीने ताब्यात

प्रतिनिधी प्रविण भिसे

दिनांक:- 17/03/2025 वार सोमवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की गुंतवणुकदारांस कोटयावधी रूपयाचा गंडा घालणारा आरोपी गुजरात येथून जेरबंद  

स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवा

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, यातील फिर्यादी अवधुत विनायक केदार, रा.खंडोबानगर, शेवगाव, ता.शेवगाव यांना साईनाथ कल्याण कवडे, रा.कुरूडगाव ता.शेवगाव याने त्याचे ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दरमहा 12% परतावा देण्याचे आमीष दाखविले.त्यावर फिर्यादी व त्याचे कुटुंबियांतील सदस्यांनी तसेच परिसरातील इतर 5 लोकांनी वेळोवेळी ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये 1,61,42,900/-रूपये गुंतविले.आरोपीने गुंतवणुकीच्या रक्कमेचा परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेली रक्कम न देता आर्थिक फसवणुक करून पळून गेला.याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं 887/2024 बीएनएस कलम 406, 409, 420 सह एमपीआयडी कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

 मा.पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्थिक फसवणुकीबाबत दाखल गुन्हयांचे समांतर तपास करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ,फुरकान शेख, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. आरोपी हा गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झालेला असून, तो सातत्याने राहण्याचे ठिकाण व मोबाईल बदलत असल्याने तपासामध्ये अडचण येत होती.दिनांक 17/03/2025 रोजी पथक वर नमूद फसवणुकीच्या गुन्हयाचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता आरोपी हा सुरत, गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली.पथकाने सुरत, गुजरात येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव साईनाथ कल्याण कवडे, वय 28, रा.कुरूडगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.

 ताब्यातील आरोपी साईनाथ कल्याण कवडे याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे मालकीची महिंद्रा कंपनीची कार किशोर शिवाजी जाधव, रा.तिसगाव, ता.पाथर्डी यास दिल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष किशोर शिवाजी जाधव यांनी हजर केलेली 15,00,000/- रू किंमतीची महिंद्रा कार क्रमांक एम.एच.-16-सीवाय-0222 जप्त करण्यात आलेली आहे.ताब्यातील आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे. सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

भामटा बिगबुल साईनाथ कवडे त्याचे फरार आरोपी वडील कल्याण कवडे सरपंच आई चंद्रकला कवडे भाऊ महेंद्र कवडे यांचा येत्या बुधवारी अटकपूर्व जामीन ता 19 मार्च रोजी खंडपीठ मध्ये ठेवला आहे त्यावर

हा त्याचा हजर होण्याचा डाव आहे का ??? का खरीच कारवाई केली आहे हे फसवणुक फसवणुक झालेल्या हजरो गुतंवणूकदारांना समजेल.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal