वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा १० ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार संपन्न

प्रतिनिधी : महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी श्रीक्षेत्र वीरची यंदाची यात्रा दि. १०/०२/२०२५ ते २८/०२/२०२५ या कालावधीत पार पडत असून दि. ११/०२/२०२५ रोजी देवाचा लग्न सोहळा होऊन यात्रेची सुरुवात होते तर यात्रेचा मुख्य दिवस मारामारी पारंपारिक रंगशिंपण दि. २३/०२/२०२५ रोजी होत आहे. 

             याकामी आज यात्रानियोजनबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणाची बैठक पुरंदर चे आमदार, मा. ना. विजयबापू शिवतारे (मा-मंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनाथ म्हस्कोबा सांस्कृतिक भवन वीर येथे शासकीय बैठक पार पडली. यात्रेसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय विभाग त्यांच्या विभागीय भूमिका याबाबत विजयबापू शिवतारे यांचेमार्फत आदेशित करण्यात आले. 

यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रमसिंग रजपूत, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सोबत सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख तसेच श्रीनाथ देवस्थान वीरचे मुख्य विश्वस्त इतर सर्व विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामस्थ, कोडीत गावचे उपसरपंच व सहकारी यावेळी उपस्थित होते.

          यात्रा काळात कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये तसेच भाविकांना दर्शनासाठी येत असताना गैरसोय होऊ नये. यासाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांना सर्व मदत करावी असे निर्देश सर्व प्रशासनास करण्यात आले. अशी माहिती विश्वस्त सुनिल धुमाळ यांनी दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal