बाकड्याच्या वादातून खळबळ! तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला कारची धडक; वडिलांचा मृत्यूपूर्वक घात, मुलगा गंभीर जखमी

बाकड्याच्या वादातून खळबळ! तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला कारची धडक; वडिलांचा मृत्यूपूर्वक घात, मुलगा गंभीर जखमी

बाळू वाघ जामनेर प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील कुंभारी बु. येथे सार्वजनिक जागेतील बाकडे हटवण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हल्ल्यात झाले. संशयित आरोपींनी दुचाकीला गाडी धडकवून पिता-पुत्रावर लोखंडी लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर २०२६) दुपारी घडली असून, पहूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदार यश ज्ञानेश्वर मोरे (वय १९, रा. कुंभारी बु.) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारी ग्रामपंचायतीचे बाकडे टाकलेले होते. या बाकड्यांवर गावातील लोक बसून धुम्रपान करत असल्याने मोरे कुटुंबाला त्रास होत होता. यावर उपाय म्हणून यश आणि त्याचे वडील ज्ञानेश्वर उत्तम मोरे (वय ४५) यांनी सरपंचांच्या पतीशी बोलून ते बाकडे हलवण्याचे काम सुरू केले होते.

त्यावेळी गावातील बाळू उत्तम जोशी, शांताराम उत्तम जोशी आणि अजय त्र्यंबक जोशी यांनी बाकडे हटवण्यास विरोध करत वाद घातला व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

गाडी अडवून लाठ्या-काठ्यांनी हल्ला

त्यानंतर यश आणि त्याचे वडील ज्ञानेश्वर मोरे हे दुचाकीने (क्र. MH-19 BT-2308) पहूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले होते. वाटेत हिवरी फाट्याजवळ संशयित आरोपींनी आपल्या कारने (क्र. MH-19 EA-9769) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दोघेही रस्त्याच्या कडेला पडल्यानंतर संशयितांनी कारमधून उतरून ज्ञानेश्वर मोरे यांच्या छातीवर, पोटावर आणि तोंडावर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच यश मोरे यालाही मारहाण करून जखमी केले.

उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू

घटनेनंतर नातेवाईकांनी आणि उपस्थितांनी गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर मोरे यांना तात्काळ पहूर येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

तीन जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तक्रारदार यश मोरे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी १) बाळू उत्तम जोशी, २) शांताराम उत्तम जोशी, आणि ३) अजय त्र्यंबक जोशी (सर्व रा. कुंभारी बु., ता. जामनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(२), ३५१(२), ३५२, ३(५) व १०९(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण मानसिंग दात्रे (PSI) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें