विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी रयत सेनेचे महावितरण कंपनीला निवेदन

विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी रयत सेनेचे महावितरण कंपनीला निवेदन

 

चाळीसगाव प्रतिनिधी :- चाळीसगाव शहरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे त्यामुळे विजग्राहकांना विजेच्या समस्येला मोठया प्रमाणात सामोरे जावे लागत असल्यामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, दररोज विज पुरवठा खंडीत होणे आणि वीज ये-जा करत असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या वतीने गेल्या पाच वर्षात दोन वेळेस वीज ग्राहकांकडे नवीन मीटर बसवले तसेच विज युनिट दर देखील अव्या च्या सव्वा वाढविले असताना आता पुन्हा स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचे केले जात आहे, प्रत्येक वेळेस नवीन इंधनभार वाढवला जात आहे यामुळे वीज ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे एवढे सर्व असूनही महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही तसेच वीज बील देयके देखील नियमित वेळेत ग्राहक भरत असतात असे असताना सुरळीत वीज पुरवठा करणे हे महावितरण कंपनीचे कर्तव्य आहे. महावितरण कंपनीने दखल घेऊन शहरात विज पुरवठा सुरळीत करावा या मागणीचे निवेदन रयत सेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी कडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रयत सेना ग्राहकांना सोबत घेऊन भर रात्रीच्या वेळेस कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करून झोप मोडो आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती आमदार, अधीक्षक अभियंता सर्कल जळगाव, तहसीलदार चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, शहरअध्यक्ष शिवाजी गवळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, विलास मराठे, समाधान मांडोळे, उपाध्यक्ष प्रकाश गवळी, संघटक दीपक देशमुख, सुधीर पाटील, दिलीप पवार, शंकर पवार, वसंत बाविस्कर, लक्ष्मण खरारे, पांडुरंग हिरे, अशोक कोल्हे, आसिफ खान आमिर खान,भावेश पगारे, कैलास माने यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें