नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू केतन मोरे याचे जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत यश!
तळोदा प्रतिनिधी : ईश्वर मराठे
तळोदा येथील नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा येथील इयत्ता 12वीचा खेळाडू विद्यार्थी *केतन सुरेश मोरे* याची नंदुरबार *जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत 45 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक* मिळवत *राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड* करण्यात आली आहे.
जुवानी या ग्रामीण भागातून येऊन मर्यादित साधनसुविधांमध्ये शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत केतनने आपल्या मेहनत, जिद्द, शिस्त आणि कठोर सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. हे निश्चितच *अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे!
वुशू हा शासनमान्य क्रीडा प्रकार असून क्रीडा क्षेत्रातील 5% आरक्षणासाठी पात्र क्रीडा प्रकारांमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे केतनसारख्या ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या यशाला विशेष महत्त्व आहे.
जिल्हास्तरावर पदक मिळवण्यासाठी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि मोठा संघर्ष करावा लागतो.
केतन आता राज्यस्तरावर नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
“परिस्थिती कितीही कठीण असो, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाची नवी उंची गाठता येते!”
केतनच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष निखिल कुमार तुरखिया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजय भाई पटेल, संचालिका सोनाबेन तुरखिया व समन्वयक हर्षिल तुरखिया, प्राचार्य सुनील परदेशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले













