शिंपी समाजातर्फे देणगीदारांचा सत्कार उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांतर्फे कलागुणांचे दर्शन
चाळीसगाव प्रतिनिधी :-
येथील शिंपी समाजातर्फे समाजाची जागा घेण्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या देणगीदारांचा जाहीर सत्कार शहरातील राजपूत मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाचे अध्यक्ष दिनेश पुरुषोत्तम बोरसे अध्यक्षस्थानी होते.
श्री संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह. भ. प. मुरारी बापू महाराज, महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार उन्मेष पाटील, ज्येष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक अभिषेक देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, नगरसेवक अनिल ठाकरे, विशाल राजपूत, प्रशांत कुमावत, उद्योजक राज पुन्शी, संदेश येवले, बाजार समितीचे सभापती किशोर पाटील, उपसभापती राहुल पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती स्मितल बोरसे, अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष नरेंद्र भामरे, रवींद्र बागूल, शिवाजीराव शिंपी, मनोज भांडारकर, विवेक जगताप, कमलाकर कापडणे, विरेंद्र भांडारकर, डॉ. संदेश निकुंभ, किशोर शिंपी, दीपक मांडगे, नरेंद्र खैरनार, भूषण कापुरे, मुकुंदराव मेटकर, संजय जगताप, अशोक चव्हाण, प्रवीण खैरनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चाळीसगाव शिंपी समाजाच्या इतिहासात या कार्यक्रमाची नोंद होईल असा कार्यक्रम झाला. सुरुवातीला अनन्या निकुंभ हिने गणेश वंदनाद्वारे कथक नृत्य तर ख्याती कापडणे हिने संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी शिंपी समाजासाठी जे जे शक्य असेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिंपी समाजाचे अध्यक्ष दिनेश बोरसे यांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केल्यचे त्यांनी सांगून आपले व शिंपी समाजाचे अतिशय सलोख्याचे संबंध असल्याचे सांगून समाजाच्या स्वतःच्या मालकीची तब्बल २६ हजार स्केअरफूट जागा घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकरणे हे समाजाच्या अस्मितेचे उदाहरण ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.












