नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; पारंपरिक कला-संस्कृतीचे अनोखे दर्शन

नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; पारंपरिक कला-संस्कृतीचे अनोखे दर्शन

नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरातील विविध ठिकाणी आदिवासी संस्कृतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांचे कार्यालया लगत सिहस्थनगर सिडको येथे ठाकर समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात परंपरा, संस्कृती आणि लोककलेचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जननायक बिरसा मुंडा, स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ठाकर समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लोकनृत्य, पारंपरिक गीत आणि विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नातेही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.

आयोजक नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजाची समृद्ध कला, परंपरा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नाशिक प्रतिनिधी — सचिन देवरे. AVB मझा

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें