बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला दमदाटी; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला दमदाटी; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथे बातमी संकलनासाठी गेलेल्या दै तरुण भारत चे पत्रकार गणेश भंडलकर यांना अटकाव करून दमदाटी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोणंद येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्रमांक १२ येथील एका स्थानिक विषयासंदर्भात पत्रकार गणेश भंडलकर हे बातमी संकलनासाठी गेले असता, प्रभाग १२ चे नगरसेवक यांचा मुलगा असगर शब्बीर इनामदार यांनी त्यांना अटकाव केल्याचे तसेच दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, नागरिकांच्या समस्या आणि सार्वजनिक प्रश्न प्रशासन व समाजासमोर मांडण्याचे काम पत्रकारांकडून केले जाते. बातमी संकलन करताना पत्रकाराला अशाप्रकारे अडवणे, दमदाटी करणे अथवा धमकी देणे ही गंभीर बाब असल्याचे पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध घटनेची चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात पत्रकारांना बातमी संकलन करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा अथवा धमकी दिली जाणार नाही, तसेच पत्रकारांनी अशा घटनांचा निषेध करून प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी लोणंद पत्रकारांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें