रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी तर्फे वंचित व गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :- गुरुकुल ट्रस्ट संचलित तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय येथे १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरच्या हस्ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रोटरी उड्डाण प्रोजेक्ट अंतर्गत गरजू व वंचित तीस मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ हरीश दवे, सायकल प्रोजेक्ट प्रमुख रवींद्र शिरुडे, रोटरीचे अध्यक्ष शालिग्राम निकम, सचिव अविनाश करंकाळ, रोटरीचे डिस्ट्रिक्ट पदाधिकारी सुधीर पाटील, प्रकाश कुलकर्णी व शाळेचे मुख्याध्यापक गोरख सूर्यवंशी यांचे उपस्थितीत मुलींना सायकल वाटप करण्यात आले. रोटरी मॅटरनल व चाइल्ड हेल्थ प्रोजेक्ट अंतर्गत शाळेला सौ मनीषा शिरुडे प्रोजेक्ट प्रमुख यांच्या हस्ते प्रथमोपचार पेटी प्रदान करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना मिशन लिटरसी अंतर्गत संवाद कौशल्य व विचारांचे प्रकटीकरण होण्यासाठी वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या .त्यात प्रथम क्रमांक रियांश चौधरी, द्वितीय क्रमांक लोरी राठोड, तृतीय क्रमांक अर्णवी कोतकर व उत्तेजनार्थ शिवकिर्ती राजपूत, स्वानंदी वैद्य व श्रेयस अहिरे हे विजयी ठरले. त्यात यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धा प्रोजेक्ट प्रमुख म्हणून निगार चव्हाण ह्या होत्या तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रद्धा देशपांडे व शितल देशपांडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन रवींद्र देशपांडे व मोराणकर मॅडम यांनी केले. यावेळी आधार महाले, भालचंद्र दाभाडे, संजय सोनवणे, रमेश पोतदार, मनीषा शिरुडे, विजय चौधरी, अमोल येवले, इनरव्हील प्रेसिडेंट डॉ. रूपाली निकुंभ, पूजा जोशी, प्रियंका वर्मा तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.













