अभिनयसम्राट, कुख्यात ब्लॅकमेलर सारिका नागरे हिच्यावर अखेर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे दखलपात्र गुन्हा दाखल.
नाशिक प्रतिनिधी :मागील अनेक महिन्यांपासून ब्लॅकमेलिंग, फसवणूक, उद्दामपणा, खोटे गुन्हे दाखल करून छळने अशा प्रकारचा खेळ समाजातील भोळ्याभाबड्या व्यक्ती आणि समाजसेवक यांच्याविरुद्ध सर्रास पद्धतीने लबाड, विचित्र प्रवृत्ती सारिका चंद्रकांत नागरे व तिचे गुंड सहकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सुरू होता.
सुवर्णकार समाजाच्या नेते आणि समाजबांधवांनी अनेक वेळा उच्च व स्थानिक प्रशासन यांच्याकडे सारिका नागरे हिच्यावर अनेक तक्रारी केल्या परंतू अतिशय धूर्त असलेल्या ह्या घातकी प्रवृत्तीने संबंधित अधिकारी, मंत्री, राजकीय नेते, उद्योजक यांच्यासोबत असलेल्या संपर्कातून माझ्याविरुद्ध कुणीही कुठेही गेलात तर माझे कुणीही काही वाकडं करू शकणार नाही अशी राजरोस धमकी संबंधित व्यक्तींना दिली. ह्या सर्वांना जनता अक्षरशः वैतागलेली होती, अनेक जनांना उद्दाम पणा, हेकडीपणा, मुजोरी मजबूरीत सहन करावी लागली.
कुख्यात गुंड, ब्लॅकमेलर सारिका नागरे हिने काही दिवसांपूर्वी तिनेच लांडीलबाडी साठी “सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था” हे दुकान चालू केले, बनावटी संघटनेत गोरगरीब नागरीकांना जबरदस्तीनं सहभागी करून घेणे, त्यांच्यावर दमदाटी करणे, त्यांना दबावाखाली ठेवणे असे सर्रास प्रकार सारिका नागरे आणि तिच्या सहकाऱ्यांमार्फत जोरात चालू होते. अशाच पाच व्यक्तींवर ब्लॅकमेलर ने खोटा गुन्हा दाखल केला, त्यांना दबावात घेत आपल्या सहकाऱ्यांसहित आपली पुन्हा एकदा नियोजन बद्ध फसवणूक चालू केली, परंतू यावेळी वैतागलेल्या पिडितांनी पोलीस स्टेशन गाठून आपली खरी बाजू स्पष्ट करून अखेर कुख्यात ब्लॅकमेलर सारिका नागरे हिच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून सुटकेचा श्वास सोडला, तरीसुद्धा पिडितांनी स्वसंरक्षणाची मागणी देखील केली.
तसेच नागरिकांच्या वतीने अशा सारीका चंद्रकांत नागरे सारख्या चालक, घातकी प्रवृत्तींना सहकार्य करणाऱ्या नराधमांवर देखील कायदेशीर कारवाई करायला हवी अशी ईच्छा व्यक्त करण्यात येत आहे.













