सततच्या पावसामुळे जुन्या नगरपालिकेचा एक भाग गॅलरी व भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

सततच्या पावसामुळे जुन्या नगरपालिकेचा एक भाग गॅलरी व भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

 

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव

चाळीसगाव शहरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील जुन्या नगरपालिकेच्या इमारतीचा एक भाग गॅलरी आणि भिंतीचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण, उपनगर अध्यक्ष हर्षल चौधरी नगरपालिकेचे अधिकारी देवेंद्र शिंदे तसेच स्थानिक नगरसेवक अनिल ठाकरे आणि सायली रोशन जाधव, नगरपालिके गटनेते प्रशांत कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने कोसळलेला मलबा हटवून परिसराची साफसफाई करण्यात आली. सततच्या पावसामुळे जुन्या आणि जीर्ण इमारती धोकादायक ठरत असल्याने अशा इमारतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें