जि. प. शाळा पाटखडकी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जि. प. शाळा पाटखडकी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी :-

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन’ने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाटखडकी येथे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन साहित्यासह आवश्यक शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे सप्रेम वाटप करण्यात आले

फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना केवळ वह्या-पुस्तकेच नव्हे, तर त्यांची आकलन शक्ती वाढवणारे विशेष वाचन साहित्य आणि दैनंदिन अभ्यासासाठी उपयुक्त असे दर्जेदार लेखन साहित्य देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड, उपाध्यक्ष आरती महाले जि. प. प्राथ. शाळा पाटखडकीचे मुख्याध्यापक बापू सोनवणे, शिक्षक अतुल गढरी आणि बापू चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी या मदतीबद्दल फाउंडेशनचे मनापासून आभार मानले आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें