15 जून रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 👉 समस्याग्रस्त व पिडीत महिलांना अडचणी मांडण्याचे व्यासपीठ.

15 जून रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
👉 समस्याग्रस्त व पिडीत महिलांना अडचणी मांडण्याचे व्यासपीठ.
गडचिरोली, दि. 8 (जिल्हा प्रतिनिधी ): जिल्ह्यातील महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या वैयक्तिक तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध विभागांशी संबंधित वैयक्तिक तक्रारींचे लेखी अर्ज स्वीकारण्यात येतील.
अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सादर करावेत. महिला लोकशाही दिनासाठीचा विहित अर्ज नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्र. 1, खोली क्र. 26 व 27, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे नि:शुल्क उपलब्ध आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी तसेच विहित नमुन्यात नसलेले अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व पीडित व समस्याग्रस्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें