घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई राष्ट्रीय जनमंच पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.

घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई राष्ट्रीय जनमंच पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव ) :- 

चाळीसगाव तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असून काही गॅस विक्रेत्यांकडून काळाबाजार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक फसवणूक होत आहे. या बाबत राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे चाळीसगाव तहसीलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की सध्या सर्वत्र गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण केला जात आहे, सुमारे ₹900 किंमतीचा घरगुती गॅस सिलेंडर हा काही विक्रेत्यांकडून ₹2000 पर्यंत विकला जात असून, ग्राहकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. तसेच, घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रास वापरले जात आहेत. परिणामी सामान्य ग्राहकांना “गॅस टंचाई”चे कारण देऊन सिलेंडर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित गॅस एजन्सी व विक्रेत्यांची तात्काळ चौकशी करुन गॅस एजन्सी मालकांचे स्टॉक मेंटेन रजिस्टर तपासण्यात यावे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.

तसेच, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवरील झालेली भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. वरील सर्व बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संभतीतावर त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ, प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग अरून सपकाळे, कायदेशीर सल्लागार आघाडी प्रमुख अँड महेश मोरे, जिल्हा सचिव अमृत सैंदाणे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेळीस, भडगाव तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, माजी सैनिक कल्याण आघाडी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण नाडार, चाळीसगाव तालुका

बांधकाम आघाडी प्रमुख अमोल पाटील, चाळीसगाव शहर अध्यक्ष अधिकार पाटोळे, बाळकृष्ण मोरे, दीपक राजपूत, प्रमोद पाटील, भालेराव पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर