शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद बंद करुन त्याचेकडुन 01 देशी बनावटीची पिस्टल व 01 जिवंत काडतुस असा एकुण 65,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजीव नवले यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक शाहुपुरी पोलीस ठाणे सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक शाहुपुरी पोलीस ठाणे सातारा यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे यांना त्यांचे खास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम मोळाचा ओढा सातारा येथील राजपुरोहित दुकानासमोर उभा असुन त्याचे जवळ पिस्टल सारखे अग्नीशस्त्र आहे. अशी खात्रीशीर गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना देवुन मिळाले बातमीप्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन एका संशयीत इसमास ताब्यात घेत असतानाता पळुन जावु लागल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास पकडुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन 01 देशी बनावटीचे पिस्टल व 01 जिवंत काडतुस असा एकुण 65,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नमुद इसमा विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजीव नवले, मा. पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री.कुमार ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, विशाल धुमाळ यांनी केली आहे.













