चाळीसगाव शिर्डी साई पालखीचे प्रस्थान

चाळीसगाव शिर्डी साई पालखीचे प्रस्थान

( चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी ) :- 

शहरातील भाजी मंडई दत्त मंदिर येथून दि २२ रोजी सालाबादप्रमाणे साई भक्तांच्या जयघोषात चाळीसगाव ते शिर्डी साईबाबांची पालखी शिर्डी कडे मार्गस्थ झाली,साई पालखी सोहळ्याला २२ वर्षं पूर्ण झाली पालखी सोहळ्यात प्रत्येक वर्षी साई भक्तांची संख्या वाढत आहे, भर उन्हाळ्यात साई भक्त मजल दर मजल पायी चालत साई नामाचा जयघोष करत रस्त्याने जात असताना अनेक समाजसेवी संस्था व स्थानिक नागरिकांनी साई भक्तांना जेवणाची व पाण्याची सोय करून दिली सलग ४ दिवस पायी चालत साई भक्त शिर्डीत दि २५ रोजी साई पालखीसह मोठ्या उत्साहात दाखल झाले, साई भक्तांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन दि २६ रोजी साई पालखी पुन्हा चाळीसगाव कडे मार्गस्थ झाली , चाळीसगाव ते शिर्डी साई पालखी मध्ये चाळीसगावातील महिला व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर पालखी सोहळ्यासाठी सर्व साई भक्तांसह श्री प्रवीण राजपूत सर श्री उदय परदेशी, दीपक पाटील, श्री भागवत नाना बच्छे, संतोष अण्णा अगोने अप्पू मामा सोनवणे,श्री. प्रदीप मराठे, राजू पवार सोमनाथ चौधरी नाना संतोष पाटील, जनार्दन वाघ, उमेश काटकर व सर्व साईभक्त यांनी परिश्रम घेतले. तसेच पालखी सोहळा साठी वीरेंद्र राजपूत (टोनू अण्णा),तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान तर्फे जलसेवा,हिरकणी महिला मंडळ, पाटणादेवी रोड ग्रुप अफू गल्ली ग्रुप, दत्तवाडी ग्रुप, संजय गांधी नगर गुप साईराम ग्रुप तांबोळा, सावरगाव ग्रुप व चाळीसगाव शहरातील सर्व साईभक्त यांनी सहकार्य केले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर