नायगावमध्ये सीसीटीव्ही तोडफोड प्रकरण कारवाई न झाल्यास 30 मार्चपासून कामबंद आंदोलनाचा इशारा- सौ स्वाती जमदाडे सरपंच

नायगावमध्ये सीसीटीव्ही तोडफोड प्रकरण कारवाई न झाल्यास 30 मार्चपासून कामबंद आंदोलनाचा इशारा- सौ स्वाती जमदाडे सरपंच

खंडाळा तहसीलदार यांना ग्रामसेवक सरपंच व नायगावचे ग्रामस्थ यांनी निवेदन दिले

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 5.07 ते 5.19 वाजण्याच्या दरम्यान वेताळ मळा परिसरातील पाण्याच्या टाकीवर बसवलेले कॅमेरे फोडण्यात आले.

या प्रकरणी श्रीमती यशोदा नामदेव बनकर (ग्रामपंचायत अधिकारी व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, डीएनए 136, खंडाळा तालुका सभासद) यांनी 24 मार्च 2026 रोजी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, श्री गणेश प्रकाश नेवसे (रा. नायगाव) यांनी कॅमेरे फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले तसेच सरपंच स्वाती आदेश जमदाडे व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविषयी अश्लील व अपमानास्पद भाषा वापरली. याशिवाय, सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडण्याची धमकीही दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तीवर 29 मार्च 2026 पर्यंत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा,महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डीएनए 136) खंडाळा तालुक्याच्या वतीने 30 मार्च 2026 पासून पंचायत समिती खंडाळा येथे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें