वाठार निंबाळकर येथे आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पाणंद रस्ते खुले
फलटण प्रतिनिधी :
मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर अंतर्गत वाठार निंबाळकर येथील चावंडीचा पानंद रस्ता तसेच तरडगाव येथील जुना महाड पंढरपूर काळूबाई मंदिर रस्ता व वाजेगाव येथील गावठाण ते बरकडे वस्ती कडे जाणारा पानंद रस्ता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेले असून आज या रस्त्यांचे भूमीपूजन आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ अभिजित जाधव, पंचायत समिती सदस्य सौ शुभांगीताई शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, युवा नेते नंदकुमार नाळे, विक्रम शिंदे, सूर्यकांत खरात, अतुल गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रशांत गायकवाड, सुभाष झुंजार, विठ्ठल शिंदे, यश गायकवाड व बहू संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.











