फलटणमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा; दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

फलटणमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा; दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

फलटण  प्रतिनिधी:
येथील मलठण परिसरातील ‘कृपासिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ’ (दिंडोरी प्रणित शाखा क्रमांक ७) च्या वतीने शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भक्तीने न्हाऊन निघाली पहाट
उत्सवाची सुरुवात पहाटे ५:१५ वाजता श्री स्वामींच्या मूर्तीस करण्यात आलेल्या मंगलमय अभिषेकाने झाली. त्यानंतर विधिवत पंचोपचार पूजा करण्यात आली. सकाळी ८:०० वाजता भूपाळी आरतीने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले, तर सकाळी १०:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न झाली.

दिवसभराचे आध्यात्मिक कार्यक्रम
प्रकटदिनाचे औचित्य साधून दुपारी ११:०० वाजता ‘श्री स्वामी सारामृत’ पोथीचे वाचन करण्यात आले. दुपारी १२:३० वाजता मांदियाळीचा कार्यक्रम पार पडला. दुपारी ३:०० वाजता ‘बारा सणांची मांडणी’ हा विशेष कार्यक्रम भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला.
पालखी सोहळा आणि महाप्रसाद
सायंकाळी ४:५० वाजता श्री स्वामी समर्थांच्या पालखीची ‘नगर प्रदक्षिणा’ मोठ्या थाटात काढण्यात आली. “श्री स्वामी समर्थ” च्या जयघोषाने संपूर्ण मलठण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी सोहळ्यानंतर सायंकाळी ६:०० वाजता पुन्हा नैवेद्य आरती करण्यात आली.
रात्री ७:०० ते ९:०० या वेळेत उपस्थित सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.

या उत्सवासाठी मलठण आणि फलटण परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या चोख नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत देखणा आणि शांततेत पार पडला.
दरम्यान फलटण शहरातील मूळ पादुका स्वामी समर्थ मंदिर बुधवार पेठ, राजनकाका देशमुख स्वामी सेवा केंद्र बुधवार पेठ, धनगरवाडा गजानन चौक स्वामी समर्थ मंदिर, गिरवी नाका स्वामी समर्थ मंदिर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर गार्डन स्वामी समर्थ मंदिर फलटण येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वामी समर्थ प्रगट दिन संपन्न झाला

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर