संत तुकाराम बीज निमित्त चाळीसगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह
चाळीसगाव प्रतिनिधी , :-
जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त शहरातील जय बाबाजी चौक येथील संत तुकाराम महाराज मंदिर येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी या किर्तन सप्ताहाची सुरूवात होत असून 7 मार्चला सप्ताहाचे काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे. त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. क्षत्रिय मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने दर वर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, यंदाचे हे किर्तन सेवा मंडळाचे 42वे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दि.28 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. अंकुश महाराज (मतवेल) यांच्या किर्तनाने होणार असून रविवार दि. 1 मार्च रोजी ह.भ.प. मुक्ताई महाराज (नाशिक), सोमवार दि.2 मार्च रोजी ह.भ.प. गोपाल महाराज (धुळे), मंगळवार दि. 3 मार्च रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (नांदगाव), बुधवार दि.4 मार्च रोजी ह.भ.प. शीतलताई महाराज (आळंदी), गुरुवार दि.5 मार्च रोजी संत तुकाराम बीज निमित्त सकाळी 10 ते 12 ह.भ. प. जितेश महाराज (म्हसावद) यांचे कीर्तन होणार असून त्याच दिवशी 5 रोजी रात्री दररोज प्रमाणे ह.भ. प. पारस महाराज (अहिल्यानगर), शुक्रवार दि.6 मार्च रोजी ह.भ. प. दिनानाथ महाराज (नाशिक), तसेच शनिवार दि. 7 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ. प. दिनानाथ महाराज (नाशिक) यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे, दररोजची कीर्तन सेवा ही रात्री ८ ते १० या वेळेत होईल. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन क्षत्रिय मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.













