“दिव्यांगत्व ही मर्यादा नसून वेगळी क्षमता” — अमोलभाऊ भागवत यांचे प्रेरणादायी आवाहन

🎤 प्रतिनिधी सचिन देवरे
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण सोहळा उत्साहात पार पडला. नागरिकांचा मोठा प्रतिसाद आणि दिव्यांग बांधवांच्या भावनिक उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक उपकरणे व साहित्य मिळावे यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांचा सन्मान करून त्यांना उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मार्गदर्शन करताना अमोलभाऊ भागवत यांनी दिव्यांग बांधवांना प्रेरणा देत सांगितले — दिव्यांगत्व ही मर्यादा नसून एक वेगळी क्षमता आहे. कधीही हार न मानता महापुरुषांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन जीवन उज्वल बनवा.
यावेळी सूरदास पावसे यांच्या वाढदिवसानिमित्त फराळ वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिणी वाघ यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal