राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या कामगार आघाडी तालुका अध्यक्षपदी अमोल पाटील यांची निवड
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
राष्ट्रीय जनमंच कामगार आघाडी पक्षाची चाळीसगाव येथे नुकतीच तालुका स्तरीय बैठक पार पडली या बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे, सामान्यांसाठी संघर्ष करणे. कामगारांच्या विषयात लढा देणे, कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवणे व त्यांना न्याय देणे या विषयावर चर्चा करण्यात आली.पक्ष संघटनेचा एक भाग म्हणुन पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्त या बैठकीत करण्यात आले. या बैठकीत अमोल पाटील यांची राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या चाळीसगाव तालुका अध्यक्ष कामगार आघाडीपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र अमोल पाटील यांना देण्यात आले. राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार, पक्षाचे धोरण घराघरात पोहोचवण्यासाठी काम करेन आणि संघटनात्मक मजबुती वाढवून पक्ष विस्तार करेल अशी ग्वाही अमोल पाटील यांनी यावेळी दिली. या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, जळगाव जिल्हाध्यक्ष वकील आघाडी एडवोकेट महेश मोरे, चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













