देवळी आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

देवळी आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-

नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्चना मोरे ह्या होत्या. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन शाळेचे प्राचार्य सतीश पाटील, मुख्याध्यापक तुषार खैरनार, जितेंद्र सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता पाटील यांनी मांडले या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट शाळेतील शिक्षिका दिपमाला जाधव, विद्यार्थी वैशाली पावरा, राधिका पावरा, पार्वती पावरा, लक्ष्मी पावरा, प्रदिप वसावे, निलम बारेला, स्नेहल पावरा, प्रियंका पावरा, निलेश पावरा, रंजित वसावे, प्रदिप वसावे यांनी मांडले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक सर्व शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संगिता पाटील यांनी केले तर आभार दीपमाला जाधव यांनी मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें