अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-  

भारतीय मराठा महासंघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. 18 व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता साजरी करण्यात आली. फुले दांपत्य हे 18 व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्करत स्री शिक्षणा साठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. अशा महान महापुरुषांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी नतमस्तक झाले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहर अध्यक्ष नंदकिशोर जाधव, शहर उपाअध्यक्ष कैलास पाटील, दिनेश नवले, सुधीर पाटील, महेश पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे सदस्य उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें