अपघाताचा बनाव उघड; फलटण ग्रामीण पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

अपघाताचा बनाव उघड; फलटण ग्रामीण पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

फलटण. प्रतिनिधी 

परराज्यात परागंदा होण्याच्या तयारीत असणा-या 02 आरोपींना अवघ्या 04 तासात केले जेरबंद !

सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीत लोंढेवस्तीनजीक फलटणरोडवर गणेश बाळु मदने वय – 40 वर्ष, रा. सस्तेवाडी, ता. फलटण हे अपघातात दुखापत होऊन मयत झाल्याची खबर उपजिल्हा रुग्णालय, फलटण यांच्याकडुन प्राप्त झाल्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे,अकस्मात मयत रजिस्टर नंबर 01/2026, भा. ना. सु. सं. 2023 चे कलम 194 अन्वये अकस्मात मयत दाखल करण्यात आले.

प्रस्तुत अकस्मात मयतेच्या तपासामध्ये पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर घटनास्थळावर रक्ताचे थारोळे दिसुन आले. परंतु मयत गणेश बाळु मदने यांची मोटार सायकल साईड स्टॅण्डवर फलटणकडे तोंड करुन सुस्थितीत उभी असल्याचे व तिच्या स्विचलाच चावीअसल्याचे पोलीसांना दिसुन आले. ही विसंगत बाब हेरुन पोलीसांनी मयतेच्या नातेवाईकांकडे विचारपुस केली. तेव्हा मयत गणेश बाळु मदने यांचे शेतात काहीवेळापुर्वी ससे पकडण्यासाठीआलेल्या दोन अनोळखी इसमांबरोबर त्यांची भांडणे झाल्याचे समजले. सदरची घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी घडल्यामुळे तांत्रिक तपासास मर्यादा येत होत्या. तरी सुद्धा तुटपुंज्या माहितीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित करुन गोपनीय बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अवघ्या 04 तासांमध्ये 1. रोहन कैलास पवार, 20 वर्ष, रा. सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा 2. गणेश शंकर जाधव, वय 22 वर्ष, सध्या रा. C/O कैलास भिमराव पवार, सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा मुळ रा. कलिना, कुंचीकोरवीगल्ली नं.07, विद्यानगरी, मुंबई 400098 हे आरोपी निष्पन्न करुन ते आरोपी परराज्यात परागंदा होण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने अटक केली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी सो, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ज्योती चव्हाण, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशिद,अमोल देशमुख व तुषार नलवडे यांनी सहभाग घेतला होता.

वरील घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 15/2026, भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103 (1), 352, 351 (2), 3 ( 5 ) अन्वये गुन्हा नोंद असुन त्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें