निंबोडी येथे संत काशिबा महाराज गुरव पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

निंबोडी येथे संत काशिबा महाराज गुरव पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

खंडाळा प्रतिनिधी 

गणेश गुरव

    गुरव समाजाचे संत श्री कशीबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त निंबोडी तालुका खंडाळा येथे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये कलश पूजन, प्रतिमा पूजन विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. खंडाळा व फलटण तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व गुरव समाज बांधव या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडाळा व फलटण तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष श्री सागर गुरव व राजेंद्र भांडवलकर यांच्या अध्यक्षतेखाली वसंत कोकीळ व संतोष कोकीळ यांच्या निंबोडी येथील निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ प नारायण महाराज शिंदे यांचे सालपे भजनी मंडळाच्या साथीने सुश्राव्य कीर्तन झाले.या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर निंबोडी गावचे सरपंच श्री बाळासाहेब शेळके, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन सावंत, ऍडव्हान्स हॉस्पिटल शिरवळ येथील डॉक्टर नरेंद्र वैष्णव उपस्थित होते. संघटनेमार्फत उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील वर्षी पुण्यतिथी सोहळा कोपर्डे येथील साळुंखे गुरव परिवार यांच्याकडे होणार असल्याचे अध्यक्षामार्फत सांगण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें