प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा संपन्न

प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा संपन्न

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव )

शिशुविहार शैक्षणिक संस्था व डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे आणि स्व.डॉ. प्रमिलाताई पूर्णपात्रे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन डॉ.सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय येथे दि.९ व १०डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव शुभांगीताई पूर्णपात्रे, तालुका गटशिक्षणाधिकारी विलास भोई, पालक संघाचे उपाध्यक्ष सुनिल चौधरी, विजयसिंग राजपूत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पारस परदेशी, मुख्याध्यापक रमेश सोनवणे, बालक मंदीराच्या मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. 

यावेळी विलासजी भोई यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिशुविहार शैक्षणिक संस्थेचे आभार व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतात शुभांगीताई पूर्णपात्रे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो व स्पर्धेची चुरस काय असते हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळते असे ते म्हणाले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिशुविहार शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पूर्णपात्रे he होते. प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी उपस्थित होते. या स्पर्धेत सुमारे ४१५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक देवांग कपिल लढ्ढा, द्वितीय क्रमांक लोकेश पिरन पाटील, तृतीय क्रमांक नैतिक प्रविण कोठावदे तर उत्तेजनार्थ लक्ष दिपक दाभाडे व खुशाल बाजीराव अहिरे यांनी पटकाविला तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक आदित्य ज्ञानेश्वर पाखले, द्वितीय क्रमांक तन्मय प्रकाश पाटील, तृतीय क्रमांक सिध्देश प्रदिप साळुंखे यांनी तर उत्तेजनार्थ खुशाल नरेश सोनार व ऋषिकेश संदिप अहिरे यांनी पटकाविला. स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिषेक जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून हेमंत गोरे, अमोल पाटील, स्वप्निल पाटील, देवेंद्र दाभाडे, योगेश साळुंखे यांनी कामकाज पाहिले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले, आभार राकेश चित्ते यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें