लोणंद येथे दि. 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत राज्य अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेचे आयोजन

लोणंद येथे दि. 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत राज्य अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेचे आयोजन

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

हँडबॉल या खेळाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणंद येथे दिनांक पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये 45व्या ज्युनिअर 19 वर्षीय मुले ह्या राज्य अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेचे आयोजन स्वर्गीय सयाजी तिरमके सर यांच्या स्मरणार्थ हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने आणि सातारा जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन सातारा यांच्या आयोजनातून लोणंद येथील मालोजीराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आलेले आहे.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील नामांकित स्पर्धक सहभागी होणार आहेत. रात्रदिवस खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धा प्रकाशझोतात पडणार आहेत.सहभागी सर्व खेळाडूंची निवास व जेवणाची सोय संयोजकांनी केलेली आहे.

 

ह्या स्पर्धेचे उद्घाटन वाई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून उद्घाटन कार्यक्रम आंतरराष्ट्रीय हॉकीपटू श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अक्षता ढेकळे,खोखो खेळाचे प्रशिक्षक दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते संजय बोडरे,राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष रविंद्र गायकवाड, महासचिव राजाराम राऊत, इंडियन असोसिएशन सहसचिव रुपेश मोरे, कोषाध्यक्ष सुनिल भोतमांगे तसेच लोणंद नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड,रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य मिलिंद माने, प्राचार्य चंद्रकांत जाधव, प्राचार्य चंद्रकांत खिलारे, प्राचार्य गोळे आणि आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी, खेळाडू, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून दि. 7 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ मिलिंद दादा पाटील,लातूर जिल्ह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे, उपायुक्त वस्तू व सेवा कर सागर धोमकर, निवृत्त उपायुक्त वस्तू व सेवा कर राहुल खरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

तरी या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील आजी माजी खेळाडू तसेच हँडबॉल व क्रीडा शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सातारा जिल्हा हौशी हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव सागर शेळके यांनी केले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें