ज्योतिर्लिंग ज्येष्ठ नागरिक संघ वाठार बु.येथील नवीन संघ शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
खंडाळा तालुक्यातील वाठार बु.येथे ज्योतिर्लिंग ज्येष्ठ नागरिक संघ दिनांक-१६ नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला.प्रथमत: दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली.सांगाती ज्येष्ठ नागरिक संघ शिरवळ या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाल ,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी,महासंघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष- डाॅ.पांडुरंग श्रीपतराव लाड. उपाध्यक्ष-श्री.आनंदराव रामचंद्र शिंदे,सातारा जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष-श्री.संपतराव मारूतराव भोसले.उपाध्यक्ष-श्री.गणेश हरीचंद्र गोळे.यांनी शासकीय सुविधा-संजयनिराधार,श्रावण बाळ,विधवा,परित्यक्ता,अपंग,आईवडिल चरितार्थ कल्याण अधिनियम २००७ -२०१०,आरोग्य सुविधा-महात्मा फुले जनआरोग्य,आयुष्य मान भारत,आयुष्य मान वयवंदन योजना,ज्येष्ठ नागरिक सुखी जीवन जगण्या विषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे खजिनदार श्री.गुलाबराव बापुराव दुधाणे,सदस्य-श्री दशरथ शंकर
तळेकर,सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य-श्री.रवींद्र लक्ष्मण शिंदे,श्री.रवींद्र उध्दवसिंग हजारे,ज्येष्ठ नागरिक संघ सालपेचे अध्यक्ष-श्री.गुलाबराव सोनबा शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघ तांबवेचे प्रतिनिधि श्री.शिंदे,उत्तरेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ विडणीचे अध्यक्ष-श्री.श्रीपाद अमृत देशपांडे,सांगाती ज्येष्ठ नागरिक संघ शिरवळचे अध्यक्ष-श्री.चंद्रकांत दत्तात्रय गुजर,पदाधिकारी श्री.दिलावर अल्लवक्ष खान,श्री.चंद्रकात भिकोबा पवार,श्री.इकबाल बाबालाल मुल्ला,श्री.किरण पिसाळ,श्री.अनंत घोलप,श्री.एकनाथ जाधव,ज्योतिर्लिंग ज्येष्ठ नागरिक संघ वाठारचे अध्यक्ष-श्री.अशोक साळुंके,उपाध्यक्ष-श्री.राजेंद्र कांबळे ,खजिनदार :-सौ.गंगा साळुंखे,सचिव-श्री.दिलीप जाधव
व कार्यकारिणी संचालक,सभासद पदाधिकाऱ्यांचे सहकार्याने उत्तम रित्या कार्यक्रम पार पडला.श्री.मोहन जाधव सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.













