खंडाळा तालुक्याचे तहसीलदार श्री अजित पाटील यांची पदोन्नती खंडाळा तालुक्याचे नूतन तहसीलदार म्हणून श्री सुहास थोरात यांची नियुक्ती
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांची नागपूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे, त्यामुळे खंडाळ्याचे नवे तहसीलदार म्हणून सुहास थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे नूतन तहसीलदार सुहास थोरात यांनी रविवारी पदांचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी खंडाळा तालुक्यातील कोणतेही प्रश्न असू द्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन पत्रकारांशी बोलताना म्हणाले
खंडाळ्याचे तहसीलदार म्हणून अजित पाटील यांनी अडीच वर्षात पानंद रस्ते ,खुले करणे , महाराजस्व अभियान ,सेवा पंधरा वडा, महाराष्ट्र शासनाकडील शंभर दिवस कृती आराखडा आधी कामे केली ,ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवल्या जात होत्या.














