“वंदे मातरम्”ला दीडशतक पूर्ण, फलटण येथे समूह गीत गायन 

“वंदे मातरम्”ला दीडशतक पूर्ण, फलटण येथे समूह गीत गायन 

फलटण प्रतिनिधी: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताच्या १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज सामुदायिक वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम फलटण येथे पार पडला. देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान यांची अनुभूती सर्वांना यावेळी आली.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार डॉ.अभिजित जाधव, प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार व ईतर मान्यवर यांनी सहभाग घेतला यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व मुधोजी हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत समूहगायनात भाग घेतला.

भारतीय जनतेच्या राष्ट्रभावनेचा श्वास असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून देशभरात अभिमान, आदर आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शाळांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत, रस्त्यांपासून ते मैदानांपर्यंत सर्वत्र “वंदे मातरम्”चे स्वर गुंजले.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथील कला शिक्षक यांनी उमेश कुंभार यांनी वंदे मातरम् चे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे रंगीत चित्र व राष्ट्रध्वज तसेच सैनिकाचे चित्र खडूने फलकावर काढले होते. या काढलेल्या चित्राचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

१८७५ मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीत “वंदे मातरम्” ही रचना केली. हे गीत नंतर स्वातंत्र्यलढ्याचं घोषवाक्य बनलं. १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच सार्वजनिकरित्या हे गीत गायले गेले. स्वातंत्र्यानंतर यालाच राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला. आज, दीडशतकानंतरही “वंदे मातरम्”चा तोच ओज, तोच अभिमान, आणि मातृभूमीवरचं अखंड प्रेम प्रत्येक भारतीयाच्या हृदयात घुमताना दिसत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें