फलटण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सात ते आठ जागा मिळाव्या – विराज खराडे

फलटण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सात ते आठ जागा मिळाव्या – विराज खराडे

फलटण – फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून एकत्र येऊन आगामी फलटण नगरपालिकेची निवडणूक लढवणे अत्यावश्यक असल्याचे मत शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक श्री.विराज खराडे यांनी व्यक्त केले.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती तसेच शहर विकास खात्यामार्फत फलटण शहरासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा नियोजनातून सुमारे 60 लाखांचा निधी तर अलीकडेच अडीच कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, संबंधित कामांसाठी टेंडर प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

फलटण शहरातील काही प्रभागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास योजनेतून 75 लाखांचा निधी मिळवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार सचिन पाटील व खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी फलटणसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असल्याचे त्यांनी नमूद केले.

खराडे पुढे म्हणाले, “ मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी फलटण साठी कोट्यावधींचा निधी आणलेला आहे त्यामुळे फलटण शहर बदलतंय. रणजितदादा यांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिकांना सन्मान दिला आहे. त्यामुळे याही वेळी आमचा सन्मान राखला जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. महायुतीच्या माध्यमातून नगरपालिका तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणे गरजेचे आहे.”

फलटण शहरात शिवसेनेचे काही प्रभागांमध्ये विशेष प्राबल्य असल्याने 27 जागांपैकी 7 ते 8 जागा शिवसेनेला द्याव्यात, अशी मागणीही खराडे यांनी केली. लवकरच मा. खा. रणजितसिंह ना.निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यामध्ये जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हा समन्वयक विराज खराडे यांच्यासह युवासेना जिल्हा अधिकारी सचिन चव्हाण, तालुका संघटक विजयराव मायने, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार, शहरप्रमुख निलेश तेलखडे, युवा नेते अमोल निंबाळकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित पवार, माजी शहरप्रमुख अभय भोईटे, उपतालुकाप्रमुख जयदीप गुंजवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें