डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीचा तपास

सातारा; (उमेश लांडगे)
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. राजकीय दबाव आणि प्रशासकीय पिळवणूक यांमुळे त्यांचा बळी गेला असल्याचे सर्वसामान्यांना वाटते. या गाजलेल्या हायप्रोफाइल प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारला याप्रकरणी धारेवर धरले असून, या प्रकरणाशी अनेक मोठ्या नावांचा संदर्भ जोडला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या चुकीमुळे संशय बळावला होता. सर्वच क्षेत्रांतून याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी होत होती.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार याप्रकरणी एसआयटी स्थापन झाली असून, या एसआयटीचे नेतृत्व दबंग आयपीएस अधिकारी म्हणून ख्याती असणाऱ्या तेजस्वी सातपुते करणार आहेत. तत्कालीन काळात साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक असताना त्यांनी मंत्र्यांनाही दाद दिली नव्हती, याच कारणामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या काळात अधीक्षक संदीप पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमांना प्राधान्य दिले, तसेच त्यांनी नवीन उपक्रम राबविले आणि नवा पायंडा पाडला. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे एसआयटीवर सरकारचा किंवा कोणाचाही दबाव राहणार नाही, असे सद्यस्थितीत मानले जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal