चाळीसगाव येथे आज नवीन उभारण्यात आलेले सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेचा देखील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
( चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी):-
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दोन विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज दि.२ रोजी संपन्न होत आहे. यात चाळीसगाव नगरपरिषदेच्या सुवर्णा स्मृती उद्यान नूतनीकरणच्या १० कोटी निधीतून पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण व शहराची २०५६ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेत १४२ कोटी रुपयांच्या नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.२ रोजी सायंकाळी ६ वाजता सुवर्णा स्मृती उद्यान, बसस्थानक समोर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आपल्या चाळीसगाव शहरातील ‘सुवर्णा स्मृती उद्याना’चे नुतनीकरण, उभारणी अशा ‘स्मार्ट’ पद्धतीने केली आहे. उद्यानात साकारलेल्या सुविधा उच्च दर्जाच्या असून त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जागतिक मानांकनाची मुद्रा कोरलेले आहे. जिथे पर्यावरण, अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ या तिघांची गळाभेट होते. सोबतचं चाळीसगाव शहरासाठी १४२ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमीपुजन शुभारंभही होत आहे. या योजनेमुळे पुढील तीन दशके म्हणजे २०५६ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहीत धरुन प्रति माणसी १३५ लिटर पाणी देणे शक्य होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा देखील सुरळीत होईल. योजनेत अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून शहरात चार नवीन जलकुंभांचीही उभारणी करण्यात येणार आहे. उद्यानाचा ‘लोकार्पण सोहळा’ आणि पाणीपुरवठा योजनेचा ‘भूमीपुजन शुभारंभ’ सोहळ्यासाठी तसेच स्मार्ट चाळीसगावच्या निर्माणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त चाळीसगावकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.













