धुळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न.

धुळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची धुळे महापालिका निवडणुकी संदर्भात बैठक काल रणजीत राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली.

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे

धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 या विषयावर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक, प्रभाग रचना, मतदार याद्या, आरक्षण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबई येथे पक्षाच्या बैठकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, प्रभारी आमदार रोहित दादा पवार, माजी आमदार सुनील भुसारा, निरीक्षक उमेश पाटील यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार व आदेशानुसार यांनी दिलेल्या सूचना या बैठकीमध्ये सांगण्यात आल्या. वरिष्ठांच्या सूचनानुसार निष्ठावंत, तरुण, युवा, महिलांना या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने उमेदवारी देण्यात येईल. तसेच ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बॅनरखालीस लढून विजय प्राप्त करण्याचा असे कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार केला. या बैठकीमध्ये प्रभाग निहाय, इच्छुक उमेदवार, प्रभागाची परिस्थिती यांची चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवार यांनी आपल्या प्रभागांमध्ये फिरून लोकांशी संवाद वाढवावा असे ठरले. तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात येईल.यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला रणजीत राजे भोसले, शशी नाना भदाने, नंदू येलमामे, गोरख शर्मा, अशोक धुळकर, जगन बापू ताकटे, राजू डोमाळे, बिका नेरकर,डी टी पाटील, संजय माळी, दीपक देवरे,अमित शेख, कुणाल वाघ, रामेश्वर साबळे, मयूर शिंदे, मंगलदास वाघ, सोनू गुजर, विश्वजीत देसले, स्वामिनी पारखे, सोनु घरू, युसुफ शेख, शोएब अन्सारी, राजू मशाल, राजू चौधरी, उजेर शेख, कल्पेश मगर, संजय नेतकर, बरकत शहा, समद शेख, सुरेश जवराळ, सज्जन बागुल विकी धिवरे व असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें