वनरक्षक-वनपाल संघटना शाखा नंदुरबारची त्रैमासिक सभा यशस्वीपणे संपन्न
तळोदा, दि. 11 :-
वनरक्षक-वनपाल संघटना शाखा नंदुरबार यांची त्रैमासिक सभा आज दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन भवन, गांधीनगर (अंबिका ट्रेडर्सच्या मागे, धुळे रोड, नंदुरबार) येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर वनरक्षक भानुदास वाघ यांनी स्वतः रचून सादर केलेले स्वागत गीत उपस्थितांच्या मनाला भावले.
सभेचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष अरविंद निकम यांनी भूषविले. व्यासपीठावर उपाध्यक्ष कल्पेश अहिरे, सचिव भरतसिंग परदेशी, वृत्तीय संघटक (पुरुष) युवराज भाबड, वृत्तीय संघटक (महिला) वैशाली कुवर सहसचिव अशोक पावरा तसेच प्रदेश सचिव दिपक जमदाडे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुपेश तांबोळी यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन भानुदास वाघ यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

सभेत खालील प्रमुख विषयांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली —
संघटना सदस्यांच्या अडीअडचणी व त्यांच्या सोडवणुकीसंबंधी उपाययोजना
संघटनात्मक कामकाज व सदस्य नोंदणी अद्यावत ठेवणे
सेवासंबंधी व कायदेशीर प्रश्नांवरील मार्गदर्शन
सामाजिक, बांधिलकी व कल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी
शासन व जनप्रतिनिधींशी सुसंवाद वाढविण्याबाबत चर्चा
संघटनेतील कार्यकर्त्यांना सन्मान चिन्ह (ट्रॉफी) भेट म्हणून देण्यात आले. अध्यक्षांच्या अनुमतीने अन्य तत्काळ विषयांवर देखील चर्चा घेण्यात आली
आजच्या सभेला नंदुरबार जिल्ह्यातून वनपरिक्षेत्र बिलगाव, अक्राणी, काकरदा ,तोरणमाळ, शहादा, नवापूर, चिचपाडा,व नंदुरबार येथील सर्व पदाधिकारी संघटक शेकडो वनरक्षक वनपाल व वन कर्मचारी मिटींगला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिव श्री. भरत

सिंग परदेशी यांनी आभार प्रदर्शन करून सभेची सांगता करण्यात आली.
सभा अत्यंत उत्साही आणि संघटनात्मक ऐक्य दृढ करणारी ठरली.













