साताऱ्यात ‘नमो युवा रन 2025’ उत्साहात संपन्न ‘नशामुक्त भारत’चा संदेश घेऊन 2500 स्पर्धकांचा सहभाग

साताऱ्यात ‘नमो युवा रन 2025’ उत्साहात संपन्न

‘नशामुक्त भारत’चा संदेश घेऊन 2500 स्पर्धकांचा सहभाग

सातारा, 21 सप्टेंबर 2025: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आयोजित केलेली ‘नमो युवा रन 2025’ सातारा राजधानीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन पंधरवड्यांतर्गत ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.

 

सातारा जिल्ह्यातील पोलिस परेड ग्राउंडवरून सुरू झालेल्या या 5.5 किमी मॅरेथॉनने शिवतीर्थ, नगरपालिका, गोलबाग, मोतीचौक, पोलिस अधीक्षक कार्यालय मार्गे परत पोलिस परेड ग्राउंड येथे समारोप झाला. 2500 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी ही रन यशस्वीपणे पार पडली.

 

नमो रन कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले, सह-अध्यक्ष सुनील तात्या काटकर, उपाध्यक्ष अविनाश कदम, सोमनाथ धुमाळ, संग्राम बर्गे यांच्यासह संयोजन समितीने उत्कृष्ट नियोजन केले. रेस डायरेक्टर डॉ. दयानंद घाडगे, डॉ. नीलेश थोरात, विकास गोसावी, लक्ष्मण कडव यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. ब्रँड ॲम्बेसेडर राजू शेळके आणि सागर निंबाळकर यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

 

 महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी भाजपा नेते, युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 स्पर्धकांचा उत्साह, नेटके नियोजन आणि ‘नशामुक्त भारत’चा संदेश यामुळे ही मॅरेथॉन साताऱ्यातील एक संस्मरणीय घटना ठरली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार