कोंडवे गावाचा स्वच्छता संकल्प; एचडीएफसी बँक, शाळेचा उत्साही सहभाग

कोंडवे गावाचा स्वच्छता संकल्प; एचडीएफसी बँक, शाळेचा उत्साही सहभाग

कोंडवे, (सातारा) दि. २० सप्टेंबर २०२५ : जागतिक स्वच्छता दिनानिमित्त कोंडवे ग्रामस्थांनी एकजुटीने स्वच्छतेचा वसा घेत विविध उपक्रम राबवले. एचडीएफसी लाईफ, एचडीएफसी एर्गो आणि जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त प्रयत्नांनी अनोख्या उपक्रमाची सुरुवात. ग्रामस्थ, बँक अधिकारी आणि शाळा कर्मचाऱ्यांच्या उत्साहामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

एचडीएफसी लाईफचे विक्रय व्यवस्थापक प्रशांत लोखंडे आणि शाखा प्रमुख सतीश कारवे यांनी कर्मचाऱ्यांसह शाळा परिसर स्वच्छ केला. एचडीएफसी एर्गोचे विक्रय व्यवस्थापक अमीन मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी संदेश दिला. या उपक्रमाने आर्थिक साक्षरतेसह पर्यावरण जागरूकता वाढवली, असे सतीश कारवे म्हणाले.

जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका शकुंतला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका स्वाती धुमाळ यांनी या उपक्रमाबाबत असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतील.
आणि शाळा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह परिसर स्वच्छता, वृक्षारोपण आणि स्वच्छता शपथ कार्यक्रम राबवले. सरपंच जामीर शेख, माजी सरपंच किरण गाडे, पोलिस पाटील बाबुराव गायकवाड, शिक्षण समिती अध्यक्ष संदीप गायकवाड, आरोग्य विभागाचे महेंद्र गायकवाड (कन्हेर पीएससी) आणि अपंग सेवा संघटनेचे युवराज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

एचडीएफसी लाईफ व एर्गोचे आर्थिक सल्लागार विश्वास गायकवाड म्हणाले, “या उपक्रमाने गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेची प्रेरणा जागृत झाली आहे. बँक आणि शाळेच्या सहकार्याने पर्यावरण संरक्षण मोहीम पुढेही सुरू राहील.” कोंडवे गाव स्वच्छतेत आदर्श ठरले असून, ग्रामस्थांमध्ये पर्यावरण जागरूकता दृढ झाली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें